Home Breaking News यवतमाळ शहरातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

यवतमाळ शहरातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

33
0

 

ना. संजय राठोड यांचे हस्ते बांधले शिवसबंधन

आज यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील युवकांनी व तीनचाकी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या सदस्यांनी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे पुढाकारात मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री,वनमंत्री व जिल्ह्याचे नेते ना संजय राठोड,यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कलिंदी पवार,यवतमाळ शहराच्या नगराध्यक्ष सौ कांचनताई चौधरी,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी,जिल्हा परिषद सभापती श्रीधर मोहोड,सभापती विजय राठोड हे ह्या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रहार ऑटो रिक्षा युनियन चे जिल्हाध्यक्ष रुपेश सरडे,शहर अध्यक्ष नितीन यादव,जिल्हा संघटक सुनील कठोळे ह्यांचा आज प्रामुख्याने शिवसेनेत प्रवेश झाला.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे,पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचारांनी व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे कार्याने प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत असेच येत्या काळात शिवसेना या यवतमाळ शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आमचा प्रत  राहील असे सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्या प्रसंगी सांगितले.ह्या पदाधिकाऱ्यांसोबत अभिजित राऊत,अक्षय राऊत,शुभम शेंबेकर, जीवन शेंडे,योगेश धुर्वे,अजय शेंद्रे,रोहित वरघट,प्रतीक शेंडे,सुनील उईके,निलेश देशमुख,बंडू खंडाते,पवन परोपटे,अवचित जाधव,अजय मेश्राम,अंकुश महल्ले,राजू केने,दिनेश बनकर,दर्शन घाले, जय बेंदळे,सचिन जाधव,राज जाधव,वैभव पाटील,सुरेश जाधव,पंकज राठोड,जितेंद्र दीक्षित, दिलीप राठोड,गणेश देशमुख,संदीप भोंगाडे,सचिन लोणारे,शंकर वानखेडे,रफिक भाऊ,प्रमोद काळे,संतोष कुकुलवार,आरती राठोड,गजानन सोनोने,राहुल हातगडे, सुनिल कठोडे,प्रशांत मेश्राम,संजय जाधव,गोलू शेंडे,धीरज यादव,मोरेश्वर काटेखाये, राहुल कुमरे, सुनील उईके,उमेश भालेराव,मदन शेंडे,विनोद चौरसिया,अमर तिरळे,देवा आंबेकर,रवी ठोरे, देवानंद राऊत,गजानन वडुळकर,विनोद आदे,शिवाजी सोनोने,भगवान जाधव,विठ्ठल दोनाडकर,उमेश काळे,पप्पू पायतळे, नरेश मेश्राम,बंटी लोळके,बाळू पंडित यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ह्या प्रसंगी नगर सेवक व शिवसेना गटनेते गजानन इंगोले,नगर सेवक निलेश बेलोकर,निलेश लडके,दीपक उमरे,विनोद पवार,राहुल गंभिरे,पप्पू गजभे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here