Home Breaking News राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

40
0
पुणे (प्रतिनिधी) : राज्यात पावसासाठी ‘पोषक वातावरण आहे. मंगळवारी (१३) सोलापूर, नांदेड, लातूर उस्मानाबाद जिल्ह्यांत तर, बुधवारी (ता.१४) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यांत आणि गुरूवार (१५) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आज (ता.१२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 पश्‍चिम मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कमी होत आहे. हे क्षेत्र रविवारी पश्‍चिम उत्तर दिशेने सरकत होते. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनमपासून ते आग्नेयेकडे ४०० किलोमीटर, तर काकिनाडापासून आग्नेयेकडे ४९० किलोमीटर अंतरावर होते. आज त्या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्‍यता आहे. तसेच दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीदरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर अंदमान समुद्राच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र ठिकाणच्या पावसामुळे काही ठिकाणी धुक्याची बुधवारी तयार होण्याची शक्‍यता आहे. झालर पसरत आहे. पहाटे हवेत काहीसा गारवा यामुळे पुढील काही दिवस राज्यातील तयार होत आहे. साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे वातावरणात वेगाने बदल होणार असून अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. राज्यात होत असलेल्या तुरळक १८.७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. तर जळगाव येथे ३६.० अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
येथे पडणार जोरदार पाऊस
 सोमवारी : ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ.
 मंगळवारी : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम, यवतमाळ,
 बुधवारी : ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बौड, जालना, उस्मानाबाद, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा.
गुरूवारी : ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, अकोला, अमरावती, नागपूर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here