Home Breaking News नागरिकांचा प्रवास खड्यांतून

नागरिकांचा प्रवास खड्यांतून

64
0
प्रशासनाचे दुर्लक्ष, तातडिने डागडूजी करण्याची नागरिकांची मागणी
सोहेल चव्हाण
पुसद : नगरपालिका क्षेत्रातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर सुभाष चौक ते आंबेडकर चौक अंतर्गत रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. सध्या राज्यात पुणे वेधशाळेने हवामानाचा अंदाज वर्तविलेल्या नुसार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पुसद मध्ये सुभाष चौक ते आंबेडकर चौक हे मुख्य बाजारपेठेचा रस्ता असल्यामुळे तेथे दररोज हजारो वाहनांची ये-जा असते.
 पुसद मधील व पुसद बाहेरील आलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाजारपेठेमध्ये खरेदी करायचे असल्यास सुभाष चौक ते आंबेडकर चौक ह्या रस्त्याने जावेच लागते रोड मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. लगतच भाजी मार्केट असल्यामुळे हजारो वाहन व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना खड्ड्यांचा अंदाज नसल्यामुळे पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्यामुळे येथे येणारे जाणारे लोक खड्ड्यात पडून जखमी सुद्धा झाले आहे . दोन लोक मोटरसायकलने पडून त्यात एकाचा हात फॅक्चर झाले आहे . ह्या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे . याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here