Home Breaking News संतोष कावळे यांचा राम देवसरकर यांच्या हस्ते गौरव

संतोष कावळे यांचा राम देवसरकर यांच्या हस्ते गौरव

59
0
तालुका प्रतिनिधी
अंकुश कावळे :-
महागांव :- स्पीडोमीटर, अॅक्सीलेटर, शॉकअॅब्झॉबर हेडलाईट’ अशी टू व्हीलर्सना असणारी उपयुक्त साधने सायकलला बसवून ‘बहुपयोगी सायकल’ बनविणारा महागांव शहरातील इंदिरा नगर प्रभाग क्र 3 संतोष मारोती कावळे हा राम देवसरकर यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज सभापती,अर्थ व बांधकाम जि प यवतमाळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राम देवसरकर हे महागांव पंचायत समिती ला भेट देण्यासाठी आले होते. त्यांना वृत्तपत्राच्या माध्यमातून कळाले की महागांव शहरात संतोष कावळे या युवकाने चार्जिंग वर पळणारी सायकल तयार केली आहे. हे कळताच रामभाऊ देवसरकर महागांव ला संतोष च्या पाठीवर एक कौतुकाची थाप देऊन गौरविण्यात आलं. राम भाऊ देवसरकर बोलताना म्हणाले की संतोष हि चार्जिंग वर पळणारी सायकल तयार करण्यासाठी काही गरज भासल्यास भेटायचं आणी हि तु जे चार्जिंग वरची सायकल तयार केली आहे ती इलेक्ट्रिक लाईनवर चार्ज करण्या ऐवजी पॅडल मारुन चार्जिंग केली तर आणखी सोयीस्कर होईल असे संतोष शी बोलताना म्हणाले यावेळी राम देवसरकर, राजु राठोड, अनिता चव्हाण, ठाकरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन भाऊ वाघमारे, ज्ञानेश्वर
 ठाकरे, संजय पाटे, महेन्द्र कावळे, संतोष गायकवाड आदि मान्यवरांनी संतोष कावळे चे अभिनंदन करीत शहराचे नाव उंचावल्या चा भावना व्यक्त केल्या. बहुपयोगी सायकल बनवित महागांव कराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अँक्सिलेटर हेडलाईट ब्रेक हाँर्न या सुविधा त्याने सायकलला बसविला चौविस वँटची बॅटरी बसवली आहे. व एक कंट्रोलर बसविले आहे. बँटरी चार्ज होण्यास तिन ते चार तास लागतात बॅटरी चार्ज झाल्यानंतर तिस ते चाळीस किलोमीटर चालते चार्जिग सपल्यास पायडल  मारुण सुद्धा चालवता येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here