Home Breaking News गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे संविधानिक सुविधा द्या : गोर सेनेची मागणी

गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे संविधानिक सुविधा द्या : गोर सेनेची मागणी

152
0
महागाव तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी अंकुश कावळे :-
महागांव :- गोर बंजारा समाज  मोठा समुदाय आहे. जो भारतीय राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे,  वेगवेगळ्या राज्यात 13  कोटीच्या जवळपास  आहे.  पुढे, आमची ही जमात संपूर्ण भारत देशात वेगवेगळ्या भौगोलिक परिसरात वास्तव्याला असून देखील  समान संस्कृती, परंपरा, बोली  भाषा, वेषभूषा आणि सण त्योहार एक सारखेच आहे. संपूर्ण देशातील गोरबंजारा समाज आदिवासी म्हणून गणला जावा आणि एस.टी.प्रवर्गाप्रमाणेच संविधानिक सुविधा प्रदान करण्यात याव्या  अशी  मागणी गोर सेनेने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
(कर्नाटक), लंबडा (तेलंगणा), लभणी, लभाना लदेणीया, बाजीगर (पंजाब), सिर्कीबंद, गोर, गोआर, गोरमाटी, मथुरा बंजारा, गाराश्या, सुगालिया, बंजारा, चारण बंजारा, भाट बंजारा, महारू बंजारा, कांगशीय बंजारा  तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजे, जनरल आणि एसटी प्रवर्गाच्या रूपात 40 हून अधिक नावे आणि त्यांची वेगवेगळ्या जातींमध्ये / प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण देशातील गोरबंजारा समाज आदिवासी म्हणून गणला जावा आणि एस.टी.प्रवर्गाप्रमाणेच संविधानिक  सुविधा प्रदान करण्यात याव्या  अशी  मागणी गोर सेनेने निवेदनातून केली आहे.              यावेळी विभागीय सयोजक गोर सिकवाडी आडे , गोर सेना माजी. जिल्हा अध्यक्ष, संजय पालतीया भिया,गोर सेना महागाव तालुका अध्यक्ष आजेश जाधव , गोर सेना ता. उप अध्यक्ष विकी भिया , भारत राठोड व गोर सेनेचे सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण समाज बांधव उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here