Home Breaking News आयुष्याच्या संध्याकाळी अनुदानासाठी ‘वेटींग’

आयुष्याच्या संध्याकाळी अनुदानासाठी ‘वेटींग’

108
0
चार महिन्यापासून वृद्ध, निराधारांचे अनुदान रखडले
शैलेश कोपरकर करणार लाभार्थ्यांसह आंदोलन
अंकूश कावळे
तालुका प्रतिनिधी
महागाव : संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील अनुदानाचे वाटप मागील चार महिन्यांपासून रखडले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी खडतर प्रवास करणा-या वृध्दांना अनुदानासाठी प्रशासनाकडून वेटिंगचा दूजोरा दिल्या जात आहे, ही एक शोकांतिका आहे. परिणामी, शेकडो लाभार्थ्यांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा महागाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी दिला आहे.
कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राज्यात ताळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी, संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली असून हाताला काम नसल्यामुळे गावागावात बेरोजगारी वाढली आहे.यात वृध्दांना अनुदान मिळत नसल्याने प्रशासनाविरुध्द रोष व्‍यक्त केल्या जात आहे. शिवाय,  प्रशासनाचे उंबरठे झिजवणारे  लाभार्थी संतप्त झाले आहेत मात्र या बेदखल वृद्धांचा आवाज बधीर यंत्रणेला ऐकू येत नसल्याचे दिसून येत आहे. पुढील दोन दिवसात अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नाही तर १५ ऑक्टोबर पासून तहसील समोर आंदोलन करण्याचा निर्णय शैलेश कोपरकर यांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here