Home Breaking News महिलावरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी

महिलावरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी

52
0
भाजपा महिलातर्फे महाविकास आघाडीचा निषेध
यवतमाळ : महिला अत्याचाराविरोधात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आमदार मदन येरावार व जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा तसेच शहराध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा महामंत्री राजूभाऊ पडगीलवार यांच्या नेतृत्वात स्थानिक जुन्या बसस्थानक येथे 12 ऑक्टोबरला निषेध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने महिलांविषयी बेफिकिरीचा दृष्टिकोन सोडून महिलांच्या संरक्षणासाठी पावले टाकावीत व गुन्हेगारांना जरब बसवावा, अशी मागणी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.
महाराष्ट्रात सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. कोरोना उपचार केंद्रातही महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत गुन्हेगाराची मजल गेली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी कडून जाहीर निषेध करण्यात आला.   आंदोलनाला प्रदेश कार्यकारणी सदस्या रेखा कोठेकर, शहराध्यक्ष उषा, जिल्हा सरचिटणीस वैशाली खोंड, कीर्ती तायडे, प्राजक्ता टिकले, माणिक पांडे, जिल्हा उपाध्यक्ष कीर्ती राऊत, मीनल पांडे, नगरसेविका साधना काळे, रीता गाव तोडे, लता ठोंबरे, पुष्पा ब्राह्मणकर, करुणा तेलंग, सुनंदा ठाकरे, कविता बोरकर, आरती मुक्कावर, सविता जाधव, एबीव्हीपीच्या जिल्हा संयोजिका विजया बेस ढाले, आशिका लुटे, नेहा माहुरकर, फाल्गुनी निंगुरकर, पायल किनाके, साक्षी कुंडलीकर, माधुरी धायरी, रेखा नंदुरकर, अश्विनी चौलवार, रोकडे ताई, प्रीती सहारे, शिल्पा गवई, प्रणिता खडसे, अरुणा पिल्लेवान, अर्चना भोयर, रंजना कोंबडी, उर्मिला नाईक, भारती जाठे, लक्ष्मी सातपुते, राधिका वारे, महिला आघाडी पदाधिकारी बचत गटांचे पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी सर्व आघाड्यांचे अध्यक्ष नगरसेविका युवा मोर्चा विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here