Home Breaking News नका नका शिकवू आम्हाला

नका नका शिकवू आम्हाला

44
0
नका नका शिकवू आम्हाला
राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी मा. उद्धवजी यांना तुम्ही हिंदुत्व विसरून सेक्युलर झाले का ? अशी विचारणा केली व त्यावर मा. उद्धवजी यांनी राज्यपाल कोशारी यांना खरमरीत उत्तर दिले…….त्या पर्वभूमीवर शिवसैनिकाचे राज्यपालांना गद्य काव्य…..
नका नका शिकवू आम्हाला
महाराष्ट्र असे माझे कुटुंब
जनता माझी असे जबाबदारी,
भावना,श्रद्धा,स्वास्थ्य सर्वांचे
जपण्याची आहे पूर्ण तयारी,
महाराष्ट्रातील जनतेशी जपतो
आम्ही मराठमोळे  बंधुत्व,
नका नका शिकवू आम्हाला
तुम्ही काय अमुचे ते हिंदुत्व ।।
पाक धार्जिण्या मेहबुबांशी
जेव्हा तुम्ही युती केली,
हिंदुत्ववादी विचारांशी तुमच्या
नव्हती का गद्दारी झाली?
शत्रूशी वैराचे,मित्राशी मैत्रीचे
आम्ही सदा जपले सत्व,
नका नका शिकवू आम्हाला
तुम्ही काय अमुचे ते हिंदुत्व ।।
जेव्हा अक्रोशात झाला होता
आठवा तो बाबरीचा विध्वंस,
भले भले तेव्हा लपले होते
सांगण्या माझा नव्हे ह्यात अंश,
तेव्हा गरजले, फक्तसेना प्रमुख
हो आम्ही पाडली केली ध्वंस,
नका नका शिकवू आम्हाला
तुम्ही काय अमुचे ते हिंदुत्व ।।
पाकव्याप्त काश्मिरची महाराष्ट्राशी…
तुलना करण्याचे पातक ज्यांनी केले…..
पायघड्यांनी स्वागत तयांचे
तुम्ही सांगा कसे तुम्ही केले ?
विरोधासाठी विरोध करण्या
तुम्ही विरूरनी गेले स्वत्व,
नका नका शिकवू आम्हाला
तुम्ही काय अमुचे ते हिंदुत्व ।।
-पराग पिंगळे
शिवसेना जिल्हा प्रमुख
दिनांक 13 ऑक्टोबर 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here