Home Breaking News अंतिम वर्षाच्या परीक्षा त्वरित घ्या अन्यथा आंदोलन

अंतिम वर्षाच्या परीक्षा त्वरित घ्या अन्यथा आंदोलन

28
0
घाटंजी तालुक्यातील विद्यार्थ्यांची मागणी; तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन.
घाटंजी :   संत गाडगेबाबा बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतिम वर्ष परीक्षा घेण्यासंदर्भात वारंवार तारखा बदलवीत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मध्ये परत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. दि.०५ ऑक्टोबर पासून परीक्षा घेण्याचे ठरविले होते. परंतु विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी ‘लेखनी बंद आंदोलन’ केल्यामुळे विद्यापीठाने परीक्षा दि. १२/१०/२०२० पासून घेण्याचे ठरविले होते. दि.११/१०/२०२० ला संध्याकाळी अमरावती विद्यापीठाने परिपत्रक काढून ‘तांत्रिक अडचणी’ चे कारण देत परत दोन दिवसासाठी परीक्षेला स्थगिती देण्यात आली. या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनात परीक्षेबाबत परिपक्व नियोजनाचा अभाव दिसून येतो आहे. परिणामी, घाटंजी शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा त्वरीत घ्या, अशी मागणी तहसीलदारांमार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून नुकतीच करण्यात आली आहे.
परीक्षासंदर्भात अमरावती विद्यापीठ गंभीर नाही असे दिसुन येते. परंतु यासर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे तर त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांना जाणून घेऊन सर्व विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोनातून घाटंजी येथील विद्यार्थ्यनी एकत्र येत .तहसीलदारांमार्फत मा.राज्यपाल,महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी जर दोन दिवसांच्या आत विद्यार्थी हिताचा अंतिम निर्णय घेतला नाही तर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही तहसील कार्यालय, घाटंजी येथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. तरी याबाबत योग्य त्या उपाययोजना करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी भाविक भगत, काजल वाघाडे, ज्योसना मालांडे, प्रतीक्षा वखरे, नीलकंठ गिणगुले, मो.आदिल, अक्षय पवार, उबेज शेख, प्रफुल राऊत, स्वराज भगत, रितेश बोबडे, गजानन राऊत, सुरज धुर्वे, वसीम खान, उमेश जुनघरे, हेमंत राठोड यांच्यासह तालुक्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here