Home यवतमाळ भाई अमन गरजूंसाठी अन्नदाता…..

भाई अमन गरजूंसाठी अन्नदाता…..

102
0
ताळेबंदीत अनेकांसाठी भाई अमन ठरले जिवनवाहिनी…..
कौतुकास्पद उपक्रम, लाखोंना देताहेत अन्नदान
जितेश नावडे, संपादक
काही व्यक्ती अशी असतात की आपल्या आचार-विचारांनी समाजमन उजळून टाकतात. प्रामाणिक आणि परोपकारी कार्यातून दुस-यांच्या आयुष्याला उभारी देतात. आपल्या कार्यकर्तुत्वाने समाजासाठी दिपस्तंभ ठरतात. जिवनात आनंदाची पाखरण करतांना मनस्वी हवीहवीशी वाटतात. अंगणातील प्राजक्ताच्या नाजूक, हळूवार फुलांसारखी मनात सदैव रुंजन घालतात….असेच यवतमाळ येथील एक व्यक्तीमत्व अमन भाई यांच्या व्यक्तीमत्त्वातील हे सर्व पैलू अनुभवताना त्यांच्यातील प्रेमळ मैत्रीचा धागा कधी आणि कसा जुळून येतो, हे कळतच नाही. यवतमाळच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील बहारदार नेतृत्व असलेले अमन भाई हे ताळेबंदीत गेल्या मार्च महिन्यांपासून स्व:बळावर गरिबांची दोन वेळेची भूक क्षमवित आहे. त्यामुळे ते गरजूंसाठी जिवनवाहिनी, अन्नदाता ठरले आहे. त्यांचे ताळेबंदीच्या काळात केलेले कार्य उल्लेखनीय असून त्याचा मागोवा घेण्याचा छोटेखानी केलेला प्रयत्न.
मेहनत से उठा हूँ,
मेहनत का दर्द जानता हूँ,
आसमाँ से ज्यादा जमीं की कद्र जानता हूँ ।
छोटे से बडा बनना आसाँ नहीं होता,
जिन्दगी में कितना जरुरी है सब्र जानता हूँ।
मेहनत बढ़ी तो किस्मत भी बढ़ चली,
छालों में छिपी लकीरों का असर जानता हूँ।
बेवक़्त, बेवजह, बेहिसाब मुस्कुरा देता हूँ,
आधे दुश्मनो को तो यूँ ही हरा देता हूँ!!
काफी कुछ पाया पर अपना कुछ नहीं माना,
क्योंकि एक दिन राख में मिलना है ये जानता हूँ।
वरील उक्ती भाई अमन यांना लागू पडतात. भाई अमन हे एक बलाढ्य नाव. गरजूंसाठी देव माणूस. उपाशी राहिलेल्यांसाठी, रुग्णांसाठी देवदूत. माणसाशी माणूस म्हणून वागणारे महान व्यक्तीमत्व. अशी काही मोजकीच माणसे या जगात येतात की, जी स्वत:पेक्षा इतरांच्या जिवनाचा जास्त विचार करते. गेली १० वर्षांपासून ते लाखो, करोडो रुपयांचे भोजनदान कार्य करीत आहे. जेथे गरज पडेल तिथे ते देवदूतासारखे उभे राहून सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येतात. त्यांच्या या कार्यातून अनेकांनी प्रेरणा घ्यायला हवी. भाई अमन फ्रेंडस क्लबमधील सदस्य हे स्वताहून इतरांना मदत केल्यामुळे त्यांच्या कार्याची किर्ती आता पूर्ण जिल्ह्यात वाढतच आहे. कधीही कोण्या प्रसिध्दीमाध्यमांपूढे ते आले नाहीत.
निराधारांच्या जीवनाचा आधार
आयुष्याच्या संध्याकाळी परतीच्या मार्गावर प्रवास करताना वाटेतच सुख दुःख सहन करीत वृद्धांची हेटाळणी
होते. अनेकदा घरातून बाहेरची वाट मोकळी केली जाते. शिवाय रस्त्यावर जगणं सोसाव लागते. भुकेल्या तहानलेल्या जीवाना जगविण्याचे कार्य अमन भाई करीत आहे.
दान धर्माचा पारिवारीक वारसा
भाई अमन यांचे वडील एसटी ड्रायव्हर या पदावर कार्यरत होते. ते नेहमी सोबत डब्बा न्यायचे. या डब्ब्यात ४ ते ५ पोळी जास्त न्यायचे. जर त्यांना रस्त्यात भीकारी, गरजू, विकलांग अशी लोक आढळल्यास त्यांना ते मदत करीत होते. तशीच त्यांची आजी दर गुरुवारी, शुक्रवारी ज्वारी वाटायची, कधी पैसे वाटायचे, असे कार्य ते नित्याने करीत आले. या कार्याची छाप त्यांच्यावर बालपणीच पडली. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना दान-धर्म करायला आवडते. या जगात सर्व काही मिळते परंतु, मनशांती लाभण्यासाठी कर्म चांगले असावे लागते अशी त्यांची विचारसरणी आहे. या मदत कार्यात भाई अमन फ्रेंडस क्लबमधील सदस्य मोनू, नजीम, रहीम भाई, अल्ताफ, आमीन, शाहरुख, समीर , सोनू हे स्वताहून इतरांना मदत करतात.
सभी को एक दिन खाँक में मिलना है। जिना यही, मरना यही है। जिंदगी में जब भी मौका मिलेंगा जरुरतमंदो को मदत करो…… उसे इन्सानियत के काबील बनाओ.
– भाई अमन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here