Home Breaking News शेतकरी, मजूरांचा जिव धोक्यात

शेतकरी, मजूरांचा जिव धोक्यात

257
0
तिवरंग परिसरात आढळला अस्वल; शेतकरी, शेतमजूरामध्ये दहशत
अंकुश कावळे/तालुका प्रतिनिधी
महागाव : ग्रामीण भागात सद्यस्थितीत शेतातील सोयाबीन काढणी व कपाशी वेचणी यासह अनेक कामांना वेग आलेला आहे. यामध्ये मजुर मिळत नसल्याने मजूरांची वाणवा आहे. शिवाय नैसर्गीक फटक्याचाही सामना शेतक-यांना करावा लागत आहे. नको त्या वेळी वरुणराजा आपली हजेरी लावीत आहे. यातच वन्यप्राणीही पिकांचे नुकसान करीत असतात. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. अशातच तालुक्यातील तिवरंग परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या मजूरांना अस्वल आढळून आला. परिणामी, शेतकरी व शेतमजूर दहशतीच्या वातावरणात आहे. अशातच शेतातील काम करावे की नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. जिवावर बेतून शेतात काम करण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. वनविभागाने तातडिने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तालुक्यातील तिवरंग परिसरात निर्गुण दमगीर, सलीम साखळे, पिंटू गडदे,  मनोहर राठोड, नितीन राऊत यांचे शेतशिवार आहे. सलीम साखळे वसंत राठोड या कास्तकारांना  अस्वल आढळून आले. शिवाय, कपाशीची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. परिसरातील सर्वच लोक हे रात्री वन्य प्राणी आपल्या शेतात नुकसान करीत असल्यामुळे शेतात जागल करीत असतात. परंतु या अस्वलांच्या दहशतीमुळे यांनी आता जागल सुद्धा सोडलेली आहेत. या समोर वन्य प्राणी कास्तकारांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान करेल अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. तरी वनविभागाने याकडे  गांभीर्याने  लक्ष देऊन  अस्वलांचे तातडीने  उपाययोजना  करावी अशी  मागणी  तिवरंग  परिसरातील  शेतकरी, मजूरवर्ग व नागरिक करीत आहे.
तिवरंग येथे अस्वल निघाल्याचे कळताच आम्ही जंगलाची पाहणी केली. अस्वलाला जंगलात काढुन दिले आहे. जंगलापासुन  दोन अडीचशे मिटर अंतरावर शेती असल्यामुळे अस्वल कधी वापस येईल काही सांगता येत नाही. आम्ही सगळे दिवस रात्र मेहनत घेत आहोत व नागरिकां च्या सतत संपर्कात आहोत. लवकरच उपाययोजना करण्यात येईल.
  • पि. पी. गंगाखेडे, वनपाल वनविभाग काळी दौ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here