Home Breaking News साहेब….तुम्हीच सांगा राहायचे कुठे` : घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्‍न

साहेब….तुम्हीच सांगा राहायचे कुठे` : घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्‍न

107
0
रखडले उर्वरित हप्ते त्वरित अदा करण्याची मागणी
 ‘प्रहार’तर्फे तहसीलदारांना निवेदन; आंदोलनाचा इशारा
तालुका प्रतिनिधी अंकुश कावळे :-
महागांव :- पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजने अंतर्गत सन 2019-2020 या वित्तीय वर्षांमध्ये पंचायत समिती  व नगर पंचायत अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी  देण्यात आली. लाभार्थ्यांना अजूनपर्यंत तिसरा व चौथा हप्ता मिळाला नसल्याने घरकुलाचे काम अर्धवट राहिले आहे. लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम पूर्ण होईल, या आशेपोटी घर मोडून घरकुलाचे बांधकाम सुरू केले असता, त्यांच्याकडे पैसे नसल्याने लाभार्थी हतबल झाले आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील व शहरातील बांधकाम पूर्ण करण्यासाठी तिसरा व चौथा हप्ता मंजूर करून अदा करावे, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे १५ ऑक्टोबर रोजी तहसीदारांना निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
महागाव तालुक्यातील अनेक ग्राम पंचायततीवर  सध्या शासनाच्या वतीने प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. हे अधिकारी सध्या आपल्या घरी राहूनच प्रशासक पद सांभाळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्या सामोरे जावे लागत आहे. तरी तालुक्यातील व शहरातील पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजना  उर्वरित हप्ते तात्काळ वाटप करा,अन्यथा 15 दिवसात  तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे, रानू कुरेशी, सागर डोंगरे, पवन धरणकर,शेखर माहुरे, गणेश भवानकर आधी कार्येकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाचा हलगर्जीपणाचा आरोप
पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता प्रशासनाकडून देण्यात आला होता. त्या हप्त्याच्या  निधीवर लाभार्थ्यांनी पडके घर मोडून बांधकाम ही केले. परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या लाभार्थ्यांना तिसऱ्या व चौथ्या हप्त्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यालयात चकरा मारूनही मिळत नसल्याने लाभार्थी हताश झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here