Home Breaking News महागाव येथे  डफडा बजाव आंदोलन

महागाव येथे  डफडा बजाव आंदोलन

92
0

बंजारा समाज परिषदेंने समस्यांबाबत प्रशासनाचे वेधले लक्ष;

महागाव तहसीलदारांना निवेदन
तालुका प्रतिनिधी अंकुश कावळे :-
महागांव :- स्थानिक  वसंतरावजी नाईक चौक येथे बंजारा समाजाच्या अनेक समस्याबाबत आरक्षण, क्रिमिलियर, प्रमोशनचा विषय, गोर बोली भाषेला राजभाषेचा दर्जा मिळण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाअधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात जाऊन  राष्ट्रीय बंजारा परिषदचे सर्व पदाधिकारी व गोर बंजारा समाजातर्फे १५ ऑक्टोबर रोजी डफडा बजाव आंदोलन करण्यात आले.  तहसीलदार इसाळकर  यांना निवेदन देऊन सदर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी ॲडव्‍होकेट रवींद्र बाबुसिंग जाधव यांनी समाजाच्या एकजूट ते बद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक तांड्याला महसूली दर्जा  प्राप्त झालाच पाहिजे, शिवाय वेळोवेळी बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांना  लागणाऱ्या  नॉन क्रिमिलियरच्या अटीबाबत मार्गदर्शन केले. तसेच युवा जिल्हा अध्यक्ष बाळू राठोड यांनी बंजारा समाजावर होत असलेल्या अन्याय बाबत सखोल असे मार्गदर्शन जनतेस केले.
या आंदोलनाचे प्रास्ताविक, आभार प्रदर्शन प्रवीण जाधव यांनी केले. यावेळी उपस्थित बाळू राठोड, युवा जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र जाधव ,विधी जिल्हाध्यक्ष डॉक्टर  अरविंद पवार  सर ,देविदास  राठोड, जिल्हा संघटक प्रवीण जाधव, तालुका सचिव अंकुश आडे ,अशोक चव्हाण ,सुनील चव्हाण ,सतीश जाधव, ज्ञानेश्वर जाधव ,बबन चव्हाण, वसंत जाधव, इंदल आडे, खुशाल चव्हाण, वसंता राठोड, इंदल राठोड ,किशोर चव्हाण, रोहिदास राठोड, इत्यादी लोकांनी या व बंजारा समाज बांधवांनी डफडा बजावो आंदोलनामध्ये हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here