Home Breaking News जगावे कसे…? आम्हालाच ठाऊक…. : निराधारांची प्रशासनास हाक

जगावे कसे…? आम्हालाच ठाऊक…. : निराधारांची प्रशासनास हाक

55
0
निधी तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी
जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी/ अंकुश कावळे :-
महागांव :-  तालुक्यातील वयोवृद्ध, निराधारांसह अपंग लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या ४ महिन्यांपासून मानधन रखडले आहे. प्रशासनातर्फे अद्यापक कोणतीही ठोस पावले उचलले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदिश नरवाडे यांच्या नेतृत्तवात विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शिवाय, निवदेनातून उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. प्रशासन काय भूमिका घेते, याकडे निराधारांसह, वयोवृध्द लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
महागाव तालुक्यातील अपंग, निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे तात्काळ त्यांचे खात्यात पैसे जमा करणे, लाभार्थ्यांचे गेल्या ४ महिन्यापासून निधी न मिळाल्याने त्यांची कुचंबना होत आहे. पालण पोषण करणारे नसल्याने शासनाशिवाय त्यांना कुठलाही आधार नाही. त्यामुळे आपण त्यांचे खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा करण्यात यावे, लाभार्थ्यांचे वय ६५ वर्षी पेक्षा जास्त असल्याने त्यांच्या पगाराची व्यवस्था गावा-गावात नविन बँका व सि.एस.पी. च्या माध्यमातून करण्यात यावी, वयोवृध्द लोकांना शासनाच्या शिवभोजन थाली मोफत देण्याची व्यवस्था तहसिलदारांनी करावी,  अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पिक खराब झाल्यामुळे कापुस, सोयाबीन या पिकाची पाहाणी व पंचनामा तात्काळ करुन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात यावी,  तालुक्यातील गावठी दारु बंद करुन कार्यवाही करावी, वरील मागण्या तात्काळ मंजुर करुन आपण सर्व वयोवृध्द लोकांना न्याय द्यावा ०१ नोव्हेंबरपासून तालुक्यातील सर्व वरील लाभार्थी तहसिल कार्यालय महागांव येथे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण करतील. त्यांचे होणारे जिवितहानीसह नुकसान झाल्यास त्यांची जबाबदारी प्रशासनाची राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here