Home Breaking News युवासेना विस्तारक दिलीप घुगे यांचा यवतमाळ जिल्हा दौरा

युवासेना विस्तारक दिलीप घुगे यांचा यवतमाळ जिल्हा दौरा

21
0
युवासेना संघटनात्मक बांधणी आढावा घेणार
प्रतिनिधी,
शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख मा.ना.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांचे आदेशान्वये नवनियुक्त युवासेना विस्तारक दिलीप घुगे हे दोन दिवसीय यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.माझे कुटुंब माझी जबाबदारी व युवासेना यवतमाळ जिल्हा संघटना बांधणी विषयक आढावा ते घेतील.
संघटनात्मक बांधणी आढावा घेण्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून येत्या काळात राबवीण्यात येणाऱ्या उपक्रमां विषयक सुद्धा मार्गदर्शन ते करणार आहेत.यवतमाळ जिल्ह्यामध्ये युवासेनेची जी पदे रिक्त आहेत त्यांच्या जागी काम करायला इच्छुक युवा सैनिकांच्या मुलाखाती सुद्धा ते घेणार आहेत.
आढावा बैठक व मुलाखती ह्या विधानसभा अनुसारे होणार असून रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी स.1.वा.वणी विधानसभा,दु.2. वा.आर्णी विधानसभा,दु.3. वा. पुसद विधानसभा व दु. 4.वा. उमरखेड विधानसभा यांचा आढावा घेण्यात येईल.दुसऱ्या दिवशी दिनांक 19 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी.10.वाजता यवतमाळ विधानसभा,स.11.वाजता दिग्रस विधानसभा व दुपारी.12.वाजता राळेगाव विधानसभा आढावा घेण्यात येईल.सर्व बैठका ह्या स्थानिक विश्राम गृहात आयोजित करण्यात येतील.ह्या दौऱ्यात अनेक युवकांचा युवासेनेत प्रवेश सुद्धा घेण्यात येईल.ह्या दौऱ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर,पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड उपस्थित राहतील
अधिक माहिती साठी दौरा समन्वयक उपजिल्हा युवा अधिकारी अमोल धोपेकर,जिल्हा युवा अधिकारी विक्रांत चचडा व उपजिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा यांचेशी जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधावा असे यवतमाळ युवासेना विस्तारक दिलीप घुगे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here