Home Breaking News केंद्रिय कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

केंद्रिय कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

55
0
यवतमाळ (प्रतिनिधी)  :  केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध दर्शविण्यासाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विविध आंदोलने केली जात असून त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात या वेळी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी अभियान मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातून 3 लक्ष शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीस पाठवून केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाला विरोध नोंदविण्यात येणार आहे. सदर स्वाक्षरी अभियान हे प्रत्येक तालुका स्तरावरून तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला  पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आ डॉ वजाहत मिर्झा, प्रदेश सचिव श्याम उमाळकर, अशोकराव बोबडे, माजी जी.प.उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अरुण राऊत, देवानंद पवार, न. प. गटनेते चंद्रशेखर चौधरी, अनिल गायकवाड, जि.प. सदस्य स्वातीताई येंडे, नगरसेवक जावेद अन्सारी, वैशाली सवाई, साहेबराव खडसे, दिनेश गोगरकर, विजय मोघे, वासुदेवराव महल्ले, पल्लविताई रामटेके, विशाल पावडे, ओम फुटाणे, कृष्णा पुसनाके, जितेश नावडे, विक्की राऊत, मोहसीन खान, अरुण ठाकूर, प्रदीप डंभारे, घनश्याम अत्रे, यांचे सह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते, या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या  शेतकरी बचाव रॅली या ऑनलाईन रॅली ला उपस्थिती नोंदविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here