Home Breaking News शहरात तीन विद्युत रोहित्रा सह दीडशे विद्युत पोल उभारनार

शहरात तीन विद्युत रोहित्रा सह दीडशे विद्युत पोल उभारनार

105
0
उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांची माहिती
 तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागाव दि 17 :- शहरातील अनेक ठिकाणी विद्युत पोल उभारण्यात आले नसल्याने नागरिकांना विजे अभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही अडचण हेरून सर्व नगरसेवकांनी अतिरिक्त विद्युत पोल व रोहित्र मंजूर करण्यासाठी दीड महिन्यांपूर्वी न पमध्ये ठराव घेतला असून त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे न. प. उपाध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी माहिती देतांना सांगीतले.
शहरातील १ ते १७ प्रभागातील नगरसेवकानी त्या त्या प्रभागात विद्युत पोल नसल्याचे न प कडे आपले प्रश्न मांडले होते. त्या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या न प सर्वसाधारण सभेत शहरात विद्युत रोहित्रा सह दीडशे पोलची मागणी करण्यात आली होती. तसा ठराव घेण्यात आला. १४ व्या वित्त आयोगातून सदर कामासाठी ३० लाख रुपयाची तरदूत करण्यात आली आहे. कामाची तांत्रिक मंजूरात घेण्यात आली असून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्या कडे न प चे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावास तात्काळ मान्यता मिळण्याच्या हेतूने विधानपरिषदेचे आमदार डॉ वजाहत मिर्झा यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी चर्चा करून शिफारस पत्र देण्याचे कळवले आहे. कामा बाबद जिल्हाधिकारी यांना शिफारस पत्र दिल्याने काम मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्री राठोड यांनी आमदार मिर्झा यांना भेटीदरम्यान दिले आहे. तीन विद्युत रोहित्र व दीडशे पोल शहरात उभारणी साठी निधी हा १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात येणार आहे. निधीचे अधिकार स्थानीक स्वराज्य संस्थेला आहे. शहरात एक किलोमीटर प्रयत वायरिंग सुद्धा करण्यात येणार आहे. अशी माहिती उपाध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here