Home Breaking News ती येते क्षणबर थांबते……अन् लगेच जाते….

ती येते क्षणबर थांबते……अन् लगेच जाते….

106
0

तिवरंग येथे विजेचा लपंडाव :संबंधित विभागाचा दूर्लक्षितपणा कारणीभूत

तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागांव :- तिवरंग  विद्युत कर्मचाऱ्या च्या उदासीनतेमुळे पोहंडूळ फिटर अंतर्गत येणाऱ्या विज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने गावकऱ्याना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस येताच हवेची झुळूक लागताच आलेली वीज क्षणभर थांबते आणि पून्हा परतीच्या प्रवासाला लागते. परिणामी, विजेचा खेळखंडोबा थांबण्यासाठी परिसरातील नागरिकांनी निेवेदने, तक्रारी करूनही अजूनपर्यंत समस्यांचे निवारण झालेले नाही. याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडिने कराव्‍यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.
 पोहंडुळ फिटर अंतर्गत तिवरंग मलकापूर वाकान या गावांना विद्युत पुरवठा करण्यात येत  परंतु मागील  20 ते  25 दिवसांपासून विदयुत पुरवठा सुरळीत पणे चालत नाही आहे.  एका दिवसात दहा ते पंधरा वेळेस लाईन येणे-जाणे करत असते.   गावातील वार्ड क्रमांक 1 मधील  रोहीत्रही मागील आठ ते दहा दिवसापासून फेलीवर आहेत.  या रोहीत्रावरून गावात पाणीपुरवठा करणारे नळ योजनेचे  मोटरचे कनेक्शन आहे.  वाटर फिल्टर चे कनेक्शन सुद्धा याच रोहीत्रावर आहे, ही बाब संबंधित कर्मचा-याला सांगितली असता  त्याकडे तो दुर्लक्ष करीत  तुम्ही  वरिष्ठाधिकारी यांना सांगा.  तरी  जैसे थेच स्थिती आहे.  वार्ड क्रमांक 2 मधील पथदिवे  वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर सुद्धा आज  दहा ते पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर ही आणखी बंदच आहे.
अन्‌ गावकऱ्यांचे २४ तास अंधारात
14/10/2020.सकाळी अंदाजे 10:30 पासून तर दि 15/10/2020/सकाळी 11.00 वाजेपर्यंत 24 तास वीज बंद होती यासाठी गावकऱ्यांनी दि. 15/10/2020 रोजी  वीज वितरण कार्यालय महागाव येथे निवेदनाद्वारे 15 दिवसाच्या आत विजेच्या समस्यांचे निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करू असे गावकऱ्यांनी  निवेदनात सांगितले आहे आता यावर  वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.
वीज पुरवठा लवकरच पूर्ववत
 मागील काही दिवसांमध्ये वीजपूरवठा करण्यात अडचण होती. प्रेशर नादुरुस्त असल्यामुळे त्यावर वर्क टिम आज काम करीत आहे. पावसाचे वातावरण असल्या कारणाने थोडा विलंब लागु शकतो तरी पण आज पुर्ण काम होण्याची शक्यता आहे.
-आकाश गायमुखे असिस्टंट इंजिनियर फुलसावंगी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here