Home Breaking News पायाला जिवंत विद्युत तार गुंडाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

पायाला जिवंत विद्युत तार गुंडाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

164
0

महागाव तालुक्यातील उटी येथील घटना

तालुका प्रतिनिधी : महागाव

तीन वर्षापासून पत्नीला झालेला पक्षघाताचा ( पॅरालिसिस ) आजार आणि यंदा परतीच्या पावसाने उद्धवस्त झालेले कपाशीचे पीक अशा दुष्टचक्रात सापडलेल्या उटी येथील वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने शेतातच पायाला जिवंत विद्युत तार गुंडाळून आत्महत्या केली. उटी येथे आज सकाळी घडलेल्या या थरारक घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. पंजाबराव माधवराव गावंडे (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे केवळ एक हेक्टर शेती आहे. शेतातील तोकड्या उत्पन्नामुळे ते सातत्याने गरिबीशी दोन हात करीत होते. त्यात मागील तीन वर्षापासून त्यांच्या पत्नीला पॅरालिसिस चा आजार झाल्याने ते प्रचंड विवंचनेत होते. यंदा परतीच्या पावसाने शेतातील कपाशी नेस्तनाबूत केली. या संकटाच्या मालिकेमुळे वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. सकाळी ६ वाजता शेतात जाऊन त्यांनी इलेक्ट्रिक तार पायाला गुंडाळला आणि मोटरपंपाच्या फ्यूजमधे टाकून स्वतःला करंट लावून आत्महत्या केली. थोड्या वेळाने ही घटना उघडकीस आली. शेतकऱ्याकडे सोसायटीचे कर्ज आणि खाजगी कर्ज थकीत आहे. जिवंत विद्युत तारेचा करंट लावून पंजाबराव गावंडे यांनी आत्महत्या केल्याची वार्ता गावात पोहचताच शेत शिवारात बघ्यांची मोठी गर्दी झाली. या घटनेची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here