Home Breaking News परतीच्या पावसाने स्वप्नांचा चुराडा

परतीच्या पावसाने स्वप्नांचा चुराडा

33
0
महागाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर
ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी
तालुका प्रतिनिधी अंकुश कावळे :-
महागाव : –  उधार-उसनवारी करीत बियाणे पेरले. पत्नीचे दागिेने गहाण ठेवून कर्जबाजारी झाले. पेरलेलं बि उगवलं. सोन्यासारखं वाडलं. फुल आली. फळ आली. आता बाजारात विकण्याची स्थिती आली. मुलाबाळासारखी पिके शेतकऱ्यांनी जोपासली. अशा स्थितीतील वाढलेल्या पिकांची परतीच्या पावसाने माती केली. शेतकऱ्यांची अवस्था दयनिय झाली. कर्ज जगू देत नाही. मुलाबाळांचे शिक्षणाचा प्रश्‍न झोपू देत नाही. कापुस आणि सोयाबीन या मुख्य पीकांसह इतर सर्व पीके जमीनदोस्त झाली. माळपठार म्हणुन  ओळखल्या जाणाऱ्या काळी (दौलत ) महसुल मंडळातील ३४ गावातील शेतकऱ्यांनी नुकतेच तहसील कार्यालयावर धडक दिली आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
निकृष्ट सोयाबीन बियाण्यामुळे शेतकरी गंडविला गेला. त्यानंतर सततच्या पावसाने हैदोस घातला. यात कापुस व सोयाबीनची वाताहत झाली. पावसाच्या अतिरेकामुळे  जमीन पाण्याखाली गेली. कर्जमाफीचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला नाही. ह्या सर्व समस्या पाहता, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५० हजाराची मदत, सोयाबीन,धान, व कापुस खरेदी साठी एमएसपीनुसार शासकीय खरेदी सुरू करावी आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी नरेंद्र जाधव, इंदल राठोड, विश्वास भवरे, उज्वल रणविर, प्रा.नरेंद्र जाधव, रामराव धाडवे, पुष्पाबाई कुरोडे व शेकडो शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here