Home Breaking News ‘चिंतामणी’च्या मार्गदर्शनातून ‘नमीरा’चे भविष्य उजळणार!

‘चिंतामणी’च्या मार्गदर्शनातून ‘नमीरा’चे भविष्य उजळणार!

194
0
परिस्थितीशी लढा देत पुसद येथील नमिरा मेमनचे “निट” परीक्षेत यश
पुसद, ता. २० : घरची परिस्थिती बेताची. सर्वसाधारण कुटूंबात जन्मास आलेली. रोजमजूरी करुन जिवनाचा गाडा हाकणारे आईवडिल. शिकण्याची अत्यंत तळमळ. ‘केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे’ ही म्हण प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही. परंतु, काही व्‍यक्तीमत्त्व अशी असतातं की त्या आपल्या कर्तव्‍याप्रती प्रामाणिक असतात. अशाच नमीरा या चिमुकल्या विद्यार्थिनीने परिस्थितीशी लढा देत ‘निट’ परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. अशा गुणवंताचे कौतुक होणे, ही पुसद तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे.  तिची परिस्थिती लक्षात घेता चिंतामणी क्लासेसतर्फे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, हे विशेष. तिच्या भविष्याच्या वाटेत अक्षरश: ‘चिंतामणी’ धावून आल्याची प्रचिती आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने कलंक लागला आहे. शिक्षण क्षेत्रात यवतमाळ, पुसद तालुका वगळता फारशा सोयीसुविधा नाही. अशा स्थितीत पुसद येथील चिंतामणी इन्स्टिटयूट ऑफ सायन्सने नमीरा मेमन हिची परिस्थिती लक्षात घेता. तिला उच्चशिक्षित करण्याचे ध्येय ठरविले. क्लासेसतर्फे तिला वाचनालय, डाऊट सेशन, पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. दररोज १० तास अभ्यास व सराव घेण्यात आला. शेवटी प्रयत्नांचे फळ गोड मिळाले व नमीराने सगळ्यांचे प्रयत्नाला अभ्यासाची जोड देत यश मिळविले. नमिरा मेमन हिने निट-२०२० या परीक्षेत ७२० पैकी ५३९ गुण मिळविले. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात गाठले हे विशेष. नमिरा ही अत्यंत सामान्य परिवारातील असून जिद्द व चिकाटीने हे यश मिळविले. यापूर्वी तिचे संपूर्ण शिक्षण हे उर्दू माध्यमातून झाले. पुसद येथे स्थानिक ठिकाणी राहून तिने हे यश मिळविल्याचे सांगितले. तिने आपल्या यशाचे श्रेय संस्था संचालक स्वप्निल चिंतामणी, निलेश चिंतामणी, प्रा. मो. आरिज, प्रा. सुशील पाल, प्रा. अनिल कश्यप, प्रा. रवि झा, प्रा. राजेश लोधी, प्रा. राजेश धानोरकर, निलेश गोरे समन्वयक, प्रा. मंडळ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here