Home Breaking News भाजपाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

26
0
पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे हस्ते बांधले शिवबंधन
यवतमाळ : यवतमाळ शहरातोल प्रभाग क्रमांक १३ मधील युवकांनी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे पुढाकारात मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, वनमंत्री व जिल्ह्याचे नेते. ना. संजय राठोड, युवासेना जिल्हा विस्तारक दिलीप घुगे, यवतमाळ शहराच्या नगराध्यक्ष  कांचनताई ‘चौघरी,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी,शिवसेना गटनेते गजानन इंगोले हे ह्या प्रसंगी प्रमुख्याने उपस्थित होते.
भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस तुषार देशमुख यांचे नेतृत्वात आज प्रभाग तेरा मधील कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तुषार देशमुख यांनी भाजप मध्ये जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख, तालुका सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा, माजी छात्रसंघ सचिव अमरावती विद्यापीठ ही विविध संघटनात्मक पदं भूषविली आहेत. तसेच त्यांनी लोहारा ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केले आहे. तुषार देशमुख यांचे सोबत नितीन धांदे, विलास अवघड, विलास अवघड, संदीप साबळे, विठ्ठल वेरुळकर, विलास जाधव, मधुकर लाहकुरे, चंद्रशेखर जगताप, अरविंद इरखडे, नारायण केवट, संदीप केरीकर, दिलीप कुरेकर, तारेनी मोहंती, अनिल कुसवाह, राकेश उपाध्याय, राकेश पेटकुळे, हितेश तिनघाशे, मंगेश गाडगे, परमेश्‍वर आरेकर, हिम्मतराव वाघ, अमोल गोरमाळे, उमाकांत नाईक, देवेंद्र वावरकर, रोशन गोल्हर, योगेंद्र ओरोडीया, किशोर कुकडे, राहुल गुल्हाने, गजानन खोटे  यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले.
प्रत्येक आठवड्यात प्रभाग निहाय प्रवेश घेणार
पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उडवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे व यवतमाळ जिल्ह्यात ना संजय राठोड यांचे नेतृत्व आणि कर्तुत्वावर विश्‍वास दाखवून युवक शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत.येत्या काळात होणारी यवतमाळ नगरपालिका निवडणूक पाहू जाता शिवसेनेत प्रभाग निहाय बैठका व प्रवेश सोहळे आम्ही घेणार आहोत. यवतमाळ नगर पालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा शिवसेनेचा मानस आहे,.
-पराग पिंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here