Home Breaking News ‘त्या’ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन

‘त्या’ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन

90
0
बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी दिले तात्काळ मदतीचे आश्वासन
तालुका प्रतिनिधी /अंकुश कावळे
महागाव:- महागाव तालुक्यातील उटी येथिल साठ वर्षीय अल्पभुधारक शेतकरी पंजाबराव गावंडे यांनी सततच्या नापिकीला आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटूंबियांचे  सांत्वन करण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी भेट दिली. अचानक ओढवलेल्या या आपत्कालीन परिस्थितीत सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका यावेळी त्यांनी घेतली व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास धिर दिला.
त्यांनी तात्काळ विधान परिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधून त्यांना या गंभीर परिस्थितीबद्दल माहिती दिली. तसेच आमदार महोदयांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या स्तरावरून या कुटूंबाला शक्य ती सगळी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मृत पंजाबराव गावंडे यांच्या पत्नी पॅरॅलीसिस च्या रुग्ण आहेत, त्यांच्या उपचारासाठीचा सततचा खर्च या शेतकरी कुटूंबाला न पेलवणारा आहे.या खर्चासाठी वैयक्तिक पातळीवरुन आणि शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शक्य होईल ती सगळी मदत करण्याचे आश्वासन  यावेळी आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी राम देवसरकर यांचीशी दुरध्वनीवरून बोलताना दिले.
सध्या परिस्थिती परतीच्या पावसामुळे आज संपूर्ण उमरखेड- महागाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या  संकाटात असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावल्या गेला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत आणि यासंदर्भात शासन दरबारी जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा ताकतीने मांडण्यासाठी प्रयत्नशील आहे. बळीराजा च्या पाढीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे, शेतकऱ्यांनीही धीर सोडू नये अशी विनंती  या निमित्ताने उपस्थित शेतकऱ्यांना अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here