Home Breaking News त्या समाजकंटकावर तातडिने कारवाई करा

त्या समाजकंटकावर तातडिने कारवाई करा

230
0

ठाणेदाराना निवेदन

तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे

महागांव दि 20 :- दिनांक 19/10/2020 ला कोण्या व्यक्तीने एका कार्यक्रमाच्या FACEBOOK च्या PAGE ला प्रतिसाद देताना, महान व्‍यक्तीबद्दल आक्षेपार्ह विधान लिहलेले आहे. अशा प्रकारे असंविधानिक पोस्ट केल्याने कायदा आणि सुव्यवस्था वर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता उद्भवू शकते. तरी आपण सदर व्यक्तीचा आपल्या स्तरावर शोध घेऊन सदर व्यक्तीवर सदोष गुन्हा दाखल करण्याची मागणी, सर्व सकल मराठा कुणबी समाजातर्फे करण्यात येत आहे. सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल न केल्यास पुढे कायदा आणि सुव्यवस्था वर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या करिता पो स्टे महागांव राठोड ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी भिमराव दाडेगांवकर ,आत्माराम माठाळकर, रमेश पवार, डॉ संदिप शिंदे, अमोल जगताप ,साहेबराव देशमुख, दिपक ठाकरे, रामदास ठाकरे, अनिल गांवडे, संग्राम जाधव, अतुल जाधव, पंकज देशमुख, दत्तात्रय जगताप, अतुल जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here