Home Breaking News नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्या

114
0

जिल्हा छावा क्रांतीवीर सेनेचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे

महागाव :– उमरखेड व महागाव तालुक्यात चालू आठवड्यात आलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मुंग,उडीद, इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्या, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले आहे की,येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करून ठेवले होते.पण अवकाळी पावसामुळे सोयाबीन ढिगाऱ्याखालुन पाणी वाहत आहे.त्यामुळे सर्व सोयाबीन खराब झाले आहे,अशीच गत कपाशी असणाऱ्या शेतकऱ्यांची आहे.तरी शासनाने शेतकऱ्यांनी काढलेल्या विमा लवकरात लवकर द्यावा आणि नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50000/-रु विमा द्यावा,अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष  रितेश पाटील कदम, व जिल्हा शहर आद्यक्ष पप्पू पाटील सुरोषे उमरखेड तालुकाध्यक्ष गजानन माने,संपर्क प्रमुख कुलदीप माने, तालुका उपाध्यक्ष सूरज वानखडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here