Home Breaking News खंडाळा घाटातील नागमोडी वळणावर भीषण अपघात

खंडाळा घाटातील नागमोडी वळणावर भीषण अपघात

42
0
पुसद तालुका प्रतिनिधी
पो.स्टे.पुसद ग्रामीण अंतर्गत येत असलेल्या खंडाळा घाटातील नागमोडी वळणावर पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला.
एका नामांकित कंपनीच्या ट्रॅव्हल बसचा  दि.२१ आँक्टोबर रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजताचे दरम्यान झालेल्या अपघातांमध्ये एक ४५ वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाला. जागीच ठार झालेल्या प्रवाशीची ओळख पटलेली नाही.तर १३ वर्षीय या निरागस बालकाचे उपचारादरम्यान रूग्नालयात मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.    पुणे वरून यवतमाळ करीता येत असलेली एका नामांकित कंपनीच्या ट्रॅव्हल्स बस ही खंडाळा घाटामध्ये आली असता घाटामधील नागमोडी वळणावर बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे बस खोल दरीत कोसळून अपघात झाला.    बस यवतमाळ करिता जात असताना पुसद पो.स्टे. ग्रामीण च्या कार्यक्षेत्रामध्ये हा अपघात घडला. बसमध्ये अंदाजे पंचवीस च्या जवळपास प्रवासी प्रवास करीत होते. या अपघाता मधील जखमी १९ प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापैकी ७ जखमींची तब्येत चिंताजनक असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय पुसद यांच्याकडून देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या १९ रुग्णांपैकी वृत्त लिहीपर्यंत एक रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. बाकी १८ रुग्णांना रुग्णालयांमधून सुट्टी देण्यात आली  असेही रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here