Home Breaking News तालुकाध्यक्षपदी सुनिल चव्हाण, संतोष जाधव यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती

तालुकाध्यक्षपदी सुनिल चव्हाण, संतोष जाधव यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती

98
0
तालुकाउपाध्यक्ष पदी राहुल जयस्वाल यांची निवड
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागाव :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महागाव तालुकाध्यक्ष पदी सुनिल चव्हाण , शहराध्यक्षपदी संतोष जाधव तर तालुकाउपाध्यक्षपदी राहुल जयस्वाल यांची नुकतीच निवड करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे उपाध्यक्ष राजु उंबरकर,आनंद एंबडवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महागाव तालुकाध्यक्ष पदी सुनिल चव्हाण,शहराध्यक्षपदी संतोष जाधव तर तालुकाउपाध्यक्षपदी राहुल जयस्वाल यांची निवड केली.
यावेळी मनविसेचे महेश कामारकर, यवतमाळ जिल्हा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम,बाळासाहेब दावलबाजे यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
महागाव तालुक्यातील प्रत्येक गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा निर्माण करून शेतकरी,विद्यार्थी, वंचित दुर्बल घटकाच्या न्याय हक्कासाठी लढा देवुन त्यांना न्याय मिळवुन देण्याचा मानस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here