Home यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करावा : संभाजी ब्रिगेड

यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करावा : संभाजी ब्रिगेड

43
0

मारेगाव : यावर्षी पाऊसाने संपुर्ण राज्यामध्ये दमदार हजेरी लावलेली आहे.गत वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी पाऊसाचे प्रमाण सरासरी १०२ % असल्याचे हवामान तज्ञांकडून अंदाज वर्तवण्यात आलेले होते.वास्तविक हवामान तज्ञांच्या अंदाजापेक्षा हि अधिक पाऊस सर्वत्र पडलेला आहे.यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच अपेक्षे पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.परतीच्या पाऊसाने संपुर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलेला आहे.

सदर पाऊसामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वञ शेतीमधील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.यामध्ये प्रामुख्याने सोयाबिन,कापूस पीकाला मोठ्या प्रमाणात पाऊसाचा फटका बसलेला आहे.शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.सदर परिस्थितीचा विचार करता, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा. पाऊसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचेयुद्धपातळीवर पंचनामे करण्यात यावेत.पाऊसामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना एकरी ५०,००० रुपये नुकसान भरपाई सरसकट सर्व पिकांसाठी देण्यात यावी.

तरी परिस्थितीचे गांर्भीय ओळखून शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी.व वरील मागण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी.अशी मागणी मुख्यमंञ्याना मारेगाव तहसिलदार यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेड मारेगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आली. निवेदन देते वेळी मसेसं-संभाजी ब्रिगेड मारेगाव तालुकाध्यक्ष सुमित कोकुडे,सुभाष झाडे,राहुल मांडवकर,कवडू वाघाडे,नानाजी चांदेकर,विलास टेकाम,सुभाष ठाकरेपवन महाजन, सुरज बोबडे,रमेश पाचभाई आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here