Home Breaking News नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजार रुपये आर्थिक मदत द्या

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजार रुपये आर्थिक मदत द्या

23
0
नवीन रोहित्र बसवा,मनसेच्या वतीने  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महागाव::- अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी ५००००/-रुपये तात्काळ मदत देण्यात यावी,रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतशिवारातील निकामी झालेले रोहित्र काढून नवे रोहित्र बसविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना महागाव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले
कोरोना सह विविध संकटामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला  असतांनाच त्यात आता निसर्गाने केलेली अवकृपा यामुळे शेतकरी पूर्णतः मेटाकुटीस आला आहे. ऐन काढणीच्या हंगामात हाताशी आलेले सोयाबीन,कापुस, ऊस,मुंग,उडीद,ज्वारी या पिकांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झालेले असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळुन आता जगावे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे त्यामुळे पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५००००/-(पन्नास हजार रुपये) आर्थिक मदत  देण्यात यावी तसेच तत्काळ पिक विमा देण्यात यावा.त्याचप्रमाणे आता रब्बी हंगाम सुरू होत असुन सिंचनासाठी विजेची आवश्यकता आहे परंतु तालुक्यातील अनेक शेत शिवारातील रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचन कसे करावे याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे तालुक्यातील शेतशिवारातील जळालेले रोहित्र काढून त्याठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनाची सोय उपलब्ध होईल त्यामुळे आपण शेतकरी हिताचा निर्णय घेवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा ईशारा मनसे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण,मनसे शहराध्यक्ष संतोष जाधव,मनविसे तालुकाध्यक्ष महेश कामारकर, बिहारी जयस्वाल,संजय नरवाडे,पृथ्वीराज राठोड,गोविंद राठोड,राम जाधव यांच्यासह मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here