Home Breaking News प्रभाग क्रमांक ३ मध्ये सॅनिटायझर फवारणी..

प्रभाग क्रमांक ३ मध्ये सॅनिटायझर फवारणी..

41
0
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागाव: कोरोना संसर्गजन्य अजून आटोक्यात आला नसून विविध मार्गाने या संक्रमांणाची साखळी तोडण्यास प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहे. यात महागाव नगरपंचायत अंतर्गत असलेल्या प्रभाग क्र.३ मधील सर्व भागात नगरसेवकराजु राठोड यांच्या पुढाकाराने सूक्ष्म जंतुनाशक सोडिअम हायपोक्लोराईट औषधाची फवारणी करण्यात आली. सर्व नागरिकांनी नगरसेवक राजु राठोड यांच्या नेतृत्वा बद्दल व कार्याबद्दल स्वागत करून अभिनंदन केले. अनेक लोकप्रतिनिधी अजून नागरिकांच्या आरोग्यासाठी फिरकले नाहीत पण राजु राठोड यांनी मात्र उत्तम प्रकारे काम सुरू ठेवले आहे.नागरिकांनी समाधान व्यक्त केले.सूक्ष्म जन्तु निर्जंतुक करणेसाठी उत्तम पर्याय आहे.
कीटकनाशक फवारणी मच्छरा करिता सोबतच विविध आजाराची साथ पसरत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून मलेरिया सारखे आजार होऊ शकतात या दिसते मच्छरांचा नायनाट करण्याकरिता कीटकनाशक फवारणी करण्यात आली यावेळी नगरसेवक राजु राठोड, हरीश भाऊ कामारकर, संतोष कोल्हेकर, राजु रणबावळे व महागांव नगर पंचायत कर्मचारी इ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here