Home Breaking News उद्योगांच्या सवलत योजनेत जिनिंग व प्रेसिंगचा समावेश करा

उद्योगांच्या सवलत योजनेत जिनिंग व प्रेसिंगचा समावेश करा

24
0
पालकमंत्र्यांचे उद्योगमंत्र्यांना पत्र
यवतमाळ, दि. 26 : उद्योगांसाठी असलेल्या सवलत योजनेत राज्य शासनाने जिनिंग आणि प्रेसिंगचाही समावेश करून जिनिंग व्यावसायिकांना दिलासा द्यावा, या मागणीचे पत्र वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना लिहिले आहे.
पश्चिम विदर्भ हे कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कापसावर प्रक्रिया उद्योग म्हणून जिनिंग व प्रेसिंग ही इंडस्ट्रीज चालविली जाते. सुरवातीला टेक्सटाईल यंत्रणेमार्फत जिनिंगला कर्जाच्या व्याजामध्ये सुट होती. चार-पाच वर्षांपासून ती बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सर्व उद्योग घटकांना राज्य शासनाच्या ‘पॅकेज स्कीम ऑफ इंनसेंटीव्हज’ अंतर्गत बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजात पाच टक्के सवलत देण्यात येत आहे. परंतु जिनिंग आणि प्रेसिंग या उद्योगाला सदर योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सर्व जिनिंग व प्रेसिंग उद्योग घटकाला बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत पाच टक्के व्याज दराने सवलत देण्याकरीता राज्य शासनाच्या ‘पॅकेज स्कीम ऑफ इंनसेंटिव्हज’ या योजनेत समाविष्ट करावे, असे पालकमंत्र्यांनी पत्रामध्ये नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here