Home Breaking News ‘ती’ अन्यायकारक अट रद्द करा

‘ती’ अन्यायकारक अट रद्द करा

330
0
राज्यातील आदिवासी विकास विभागांत रिक्त पदाची घरघर; पदभरती संदर्भात प्रकल्प अधिका-यांना निवेदन
सतीश बाळबुधे/ यवतमाळ प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग दिनांक २३ ऑक्टोबर २०२० मधील अ.क्र.०४ मधील उपलेखापाल पदे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवे मधुन भरण्याबाबतची अन्यायकारक अट रद्द करण्याबाबत शासनमान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनेच्यावतीने राज्यातील सर्व प्रकल्प कार्यालयीन कर्मचा-यांतर्फे प्रकल्प अधिकारी, एटीसी विभागीय कार्यालय, तथा नाशिक येथे 26 ऑक्टोबरला निवेदन देण्यात आले.
शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाने आदिवासी उपाययोजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीकरीता स्वतंत्र अर्थ व लेखा आणि लेखा परिक्षण कक्ष निर्माण करणेस मान्यता देण्यात आली असून सदर शासन निर्णयान्वये संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी व वरिष्ठ लेखापाल यांच्या एकूण २१७ नविन पदांना मान्यता देण्यात आली आहे. उक्त शासन निर्णयामधील अ.क्र.०४ वर आदिवासी विकास विभागातील एकुण ९६ मंजुर उपलेखापाल पदे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवे मधील वरिष्ठ लेखापाल संवर्गातुन भरण्यात यावी व आदिवासी विकास विभागामार्फत भरण्यात आलेल्या व सद्यस्थितीत उपलेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना आदिवासी विकास विभागाच्या इतर समकक्ष पदांमध्ये समायोजित करण्यात यावे. यापुढे आदिवासी विकास विभागांमार्फत सदर पदभरती करण्यात येऊ नये. असे नमुद आहे. ही बाब आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत कार्यालयीन कर्मचा-यांवर अन्याय कारक असून सदर अटी मूळे वर्ग-०४, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीचा मार्ग पुर्णपणे बंद होणार आहे. सदर कर्मचारी हे पदोन्नती पदापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन कर्मचा-यामध्ये असंतोष वाढलेला आहे, अन्यायाविरुद्ध तिव्र आंदोलन करण्याच्या तयारित आहे. तरी उक्त शासन निर्णयातील उपलेखापाल पदे आदिवासी विकास विभागातुनच भरणेबाबत सुधारित आदेश निर्गमित करावेत व सदरील शासननिर्णय रद्द करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, 26 ऑक्टोबरला झुम मिटींगद्वारे राज्य कमिटीतील पदाधिका-यांतर्फे निषेध सभा घेऊन पुढील आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली आहे. सभेस संस्थापक अध्यक्ष विक्रमजी गायकवाड, राज्याध्यक्ष संतोषजी राऊत, राज्यसरचिटणीस संजय जाधव, नंदकिशोर जगताप, प्रदीप ढगे, सुहास विरागडे, निलेश पाटील, गोकुलराव , साहेबराव सिंगरवाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here