Home Breaking News जिल्ह्यात आदीशक्तीला निरोप

जिल्ह्यात आदीशक्तीला निरोप

44
0
गर्दी टाळण्यासाठी मिरवणूक रद्द; पाच दिवस टप्प्याटप्याने दुर्गामातेचे विसर्जन
यवतमाळ : गेल्या नऊ दिवसांपासून जिल्हाभरात नवरात्रोत्सव शांततेत, उत्साहात साजरा झाला. त्यानंतर आता आई जगदंबेला निरोप देण्यात आला. शनिवार (ता. २४)पासून विसर्जनाला सुरुवात झाली. सोमवारी (ता.२६) जिल्ह्यातील जवळपास सर्वच सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनी आदिशक्तील्मा निरोप देत विसर्जन केले. यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भव्य दिव्य मिरवणुका टाळून मंडळातर्फे मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
जिल्हाभरातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यास शनिवार २४ ऑक्टोबरपासून सुरूवात केली असून,विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी २६ ऑक्टोबर रोजी शहरी भागातील ३५० तर ग्रामीण भागातील ६०० अशा ९५० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या दुर्गामूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात असलेली कोरोना परिस्थिती पाहता भव्य-दिव्य विसर्जन मिरवणुकांना बगल देत साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
यवतमाळच्या दुर्गोत्सवाने संपूर्ण राज्यात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी जिल्हाभरात असलेल्या सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाकडून वेगवेगळे देखावे, जनजागृती कार्यक्रम, विविध प्रकारचे उपक्रम आदी घेण्यात येतात. त्यामुळे नवरात्री उत्सव नऊ दिवस अत्यंत हर्षोउल्हासात पार पाडण्यात येतो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वत्र अगदी साध्या पद्धतीने दुर्गोत्सव साजरा करण्यात आला. विसर्जना दरम्यान देखील याचे पालन करण्यात आले. आणखी दोन दिवस विसर्जन सुरू राहणार आहे. सर्वांनी नियम पाळावे ,असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here