Home Breaking News पीक कर्ज तत्काळ वाटप करण्याची मागणी

पीक कर्ज तत्काळ वाटप करण्याची मागणी

69
0

प्रहार उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे यांचा इशारा,

प्रहारच्या वतीने तहसिलदारा मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन तालुका प्रतिनिधी अंकुश कावळे

महागांव :- शेतकऱ्यांच्या हाकेला बैंक प्रशासनाने प्रतिसाद न मिळाल्याने युनियन बैंकेच्या काचा फुटल्या,पीक कर्ज घेण्याकरिता नेहमी प्रमाणे युनियन बैंक इथे आले असता,खूप गर्दी असल्यामुळे शेतकरी बैंकेच्या आत जाण्यासाठी गडबड करू लागले होते, या झटपतीमध्ये बैंकेच्या दरवाज्या चा काच फुटला त्यानंतर सुरक्षा रक्षक याने शेकऱ्यांसोबत झटपटी केली उद्धट वागणूक आरवेच भाषेत बोलू लागला त्यानंतर बैंकेचे व्यवस्थापक यांनी पो.स्टे.ला अज्ञान व्यक्तीच्या नावे गुन्हा दाखल केला व बैंक बंद करण्यात आली. यामुळे शेतकरी संतप्त झाले बैंकेचा काच फुटला हे कळताच त्यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे आदी कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यावर बैंक व्यवस्थापकाला संपर्क केला, असता संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. प्रहार उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे यांनी सर्व शेतकरी यांना घेऊन तहसिल कार्यालय गाठले व तहसीलदार इसळकर साहेबांना सर्व व्यथा सांगितली असता,तहसीलदार साहेब म्हणाले की तुम्ही लेखी तक्रार द्या यावर प्रहार जनशक्ती पक्षाने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तीन ते चार दिवसात सर्व पीक कर्ज वाटप करा अन्यथा ०२/११/२०२० ला धरणे आंदोलन,किंवा रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाविषयी तहसील येथे आढावा बैठक घेतली होती.त्यामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सर्व बैंकेच्या बैंक व्यवस्थापकाना खा. पाटील यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी,असे ठणकावून सांगितले होते,परंतु असे कुठेही दिसून येत नाही.यामध्ये तर युनियन बैंक मध्ये कधीच शेतकरी व नागरिकांना सुद्धा उद्धट बोलणे, उद्धट वागणूक नेहमी पहावयास मिळते.महिन्याभरापासून बैंकेच्या फेऱ्या मारणाऱ्या शेतकरी यांना आजूनसुद्धा पीक कर्ज मिळाले नाही,शेतकऱ्यांना कोणी वाली आहे का नाही. असे असताना महाराष्ट्रात नेहमी शेतकऱ्यांसाठी लढा देणारे प्रहार संथापक राज्यमंत्री मा.बच्चू कडू यांचे कार्यकर्ते त्याठिकाणी येऊन तहसीलदार इसळकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,तीन ते चार दिवसात सर्व पीक कर्ज वाटप करावे.अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे, तालुका प्रमुख पवन धरणकर,उपतालुका प्रमुख सागर डोंगरे, शहर प्रमुख राणू कुरेशी व शेतकरी प्रदीप चव्हाण,अविनाश पवार,विनोद शेळके,विजय पानपट्टे,अमोल पवार असंख्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here