Home Breaking News ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार ठार तर एक जखमी

ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वार ठार तर एक जखमी

339
0

खडका उड्डाणपुलावरील घटना)

तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे

महागाव :-
तालुक्यातून जाणाऱ्या नागपुर – बोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील खडका नजिक असलेल्या उड्डाणपूला वर नुकताच एका ट्रक व दुचाकींची सामोरा समोर धडक लागून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
महागाव तालुक्यातील माळवागद येथील खुशाल गब्बा जाधव (वय ३२)वर्षे ओंकार कैलास जाधव(२०)वर्षे हे दोघे आपल्या दुचाकी क्र. एम एच.२९बिके४२८३ ने महागाव येथे बँकेच्या कामासाठी जात असताना खडका येथील उड्डाणपुलावर त्यांच्या मोटार सायकलला समोरून केळी घेवुन जाणाऱ्या ट्रक क्र. डी एल.१जि सि३७६५ ने समोरासमोर धडक दिल्याने या धडकेत दुचाकीवरील खुशाल जाधव हा जागीच ठार झाला तर ओंकार हा गंभीर जखमी झाला हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये मोटारसायकल ट्रकच्या समोरच्या भागात अडकुन जवळपास १००मीटर फरफटत नेली.अपघात घडल्यानंतर नागरिकांनी अपघात स्थळी एकच गर्दी केली होती जखमी ओंकार जाधव याला नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात हलविले या अपघात घडताच ट्रक चालक ट्रक सोडून पळुन गेल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती महामार्ग पोलिस केंद्र कोसदनी चे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दुरपडे,महागाव चे ठाणेदार पोलिस निरीक्षक दामोदर राठोड, महामार्ग पोलिस कर्मचारी रुपेश तिजारे,गुणवंत बोईनवाड,मधुकर राठोड यांनी घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठविला असुन पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here