Home Breaking News महागांव शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : अशोकराव चव्हाण

महागांव शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : अशोकराव चव्हाण

137
0
माजी मुख्यमंञी तथा सार्वजनिक बांधकाम मंञी अशोकराव चव्हाण.
तालुका प्रतिनिधी /अंकूश कावळे
महागांव, ता. १ : काँग्रेसच्या हाती महागांव नगर पंचायतीची केवळ एक वर्ष सत्ता होती, परंतू या अल्प काळात शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे लक्षणीय विकास कामे कॉग्रेसने खेचून आणली. सिमेंट रस्ते, नाल्या, पाणी पुरवठ्याच्या सोयी व ईतर कोट्यवधीच्या विकास कामांचे आराखडे या एका वर्षात तयार झाले व कामेही मार्गी लागली. यापुढेही माजी मुख्यमंञी तथा सार्वजनिक बांधकाम मंञी म्हणुन आपण महागांव शहराच्या विकासात्मक कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. महागाव शहरातील विकास कामांच्या भूमीपूजनासाठी (ता.३१) शनिवारी ते शहरात आले होते. नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतीना नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहायक योजना २०१७-१८ अंतर्गत महागांव नगर पंचायत सिमेंट काॅक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम वार्ड क्रमांक १० ते १६ ला जोडणारा सेंटर पाॅईंट बियर शाॅपी व विजय अडकिने यांच्या घरापर्यंत सिमेंट काॅक्रीट रोड व नालीचे बांधकाम ७७.१६ लक्ष किंमतीच्या कामाचे भुमीपूजन मा.ना.श्री.अशोकराव चव्हाण आणि विजयराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील इतर विकास कामांचे भूमिपूजन लवकरात लवकर करण्यात येईल आणि विविध प्रभागांमधील प्रलंबित विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची हमी त्यांनी यावेळी त्यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आगत्यारीतील सर्व विकासत्मक कामे तातडीने पुर्ण करण्याचे आदेश प्राशासनास दिले. या कार्यक्रमाचे नियोजन उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी केले होते. यावेळी माजी आ.विजयराव खडसे, शिवाजीराव देशमुख, उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर, आरीफ सुरैय्या, सुनिल भरवाडे, शेख सलीम, शेख कासम, विजय कदम, परवेज सुरैय्या, हसीनाबी अगवान, मालाताई देशमुख, भगवान पंडागळे, गजानन कांबळे, विष्णू गावंडे, नगरसेविका छाया वाघमारे, आशा भरवाडे, मंदा महाजन, नगरसेवक नारायण शिरबिरे, विनोद कोपरकर, महेंद्र कावळे, संभाजी जाधव, शरदचंद्र डोंगरे, परवेज सुरैय्या, मुन्ना ठमके, विजयराव कदम, रामराव देवसरकर, सुनिल भरवाडे, विजय कदम, शेख सलिम, भाऊ देवसरकर, रामराव देवसरकर, सुरज धोंगडे व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here