Home Breaking News आता सर्वांनी मतभेद विसरुन एकजूट झाल्यास काँग्रेसला येणार गतवैभव

आता सर्वांनी मतभेद विसरुन एकजूट झाल्यास काँग्रेसला येणार गतवैभव

24
0
वादाफळे पॅलेसमध्ये काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत दिग्गजांनी केले मार्गदर्शन
प्रतिनिधी | यवतमाळ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी केलेल्या काळ्या कायद्याविरोधातील धग शनिवारी यवतमाळ येथे मशाल रॅलीतून जाणवली. मशाली पेटवून शेतकऱ्यांनी या कायद्याविरोधात आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांना गुलामीत लोटणारे जुलमी कायदे रद्द करा अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा सज्जड इशारा शेतकऱ्यांनी या आंदोलनातून केंद्र सरकारला दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.मशालीच्या ज्वाळांप्रमाणे शेतकऱ्यांचा रोष देखील धगधगत होता. आझाद मैदानातील जय स्तंभापासून मशाल रॅलीला सुरुवात झाली. संविधान चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत १०५ मशालींसह ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा, देवानंद पवार, मनमोहन भोयर, चंद्रकांत चौधरी, अशोक भुतडा, जावेद अन्सारी, शैलेश इंगोले, हेमंत कुमार कांबळे, विठ्ठल आडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पूर्णतः नासाडी झाली असून, राज्य सरकारने यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करावा, अशी मागणी राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊतांना भाजपने दाखवले काळे झेंडे
प्रतिनिधी | यवतमाळ
परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पक्ष यवतमाळ शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळच्या सुमारास तहसील चौकात ऊर्जामंत्री नितीन राऊत याना काळे झेंडे दाखवले.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसने सर्वत्र गाव तिथे आंदोलन अभियानाला सुरुवात केली आहे. दि. ३१ ऑक्टोबरला गावागावात मशाल आंदोलन होणार आहे. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथे मशाल रॅली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला येत असताना काँग्रेस ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना तहसील चौकात काळे झेंडे दाखवले. यावेळी राजू पडगीलवार, प्रशांत यादव, बाळासाहेब शिंदे, आकाश धुरट, माया शेरे, अजय खोंड, रोहित राठोड,शुभम सरकाळे, अभिषेक श्रीवास, योगेश चव्हाण, राहुल मेहत्रे, सूरज जैन, सूरज विश्वकर्मा, यश चव्हाण, शुभम चोरमले, अश्विन तिवारी, संकेत सवालाखे आदी उपस्थित होते.काँग्रेसचे अनेक बडे नेते शनिवारी शहरात येणार असल्याने चोख पोलिस बंदोबस्त होता.
बंजारा समाजाचे धर्मगुरू बाल ब्रह्मचारी डाॅ. रामराव बापू महाराज यांना अभिवादन
यावेळी देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ. रामराव बापू महाराज यांना यावेळी अभिवादन करण्यात आले.
जिल्ह्याने राज्याला दिले दिग्गज नेते
यवतमाळतील मतदारांनी सदैव काँग्रेसला मदत केली आहे. राज्याला अनेक दिग्गज नेते यवतमाळ जिल्ह्याने दिले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात त्सुनामी सारखी लाट आली. परंतू ह्यातून सर्वसामान्यांचा काहीच फायदा झाला नाही. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीयाविरोधात केंद्र सरकार आहे. -नितीन राऊत, ऊर्जामंत्री.
जुलमी कायदे रद्द न केल्यास परिणाम भोगण्यास तयार राहा
बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मशाल रॅलीतून शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा
प्रतिनिधी | यवतमाळ
यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे गत वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी अंतर्गत मतभेद बाजूला सारुन एकजूट झाल्यास यश नक्कीच आपल्याला मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.तसेच आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी स्थानिक नेत्यांना दिला. येथील वादाफळे पॅलेसमध्ये शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नेहरु भवन व इंदिरा सभागृहाच्या भूमिपूजनासाठी काँग्रेसचे अर्धे डझन मंत्री यवतमाळात आले होते.
कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डाॅ.नितीन राऊत,अॅड. यशोमती ठाकूर, विजय वड्डेटीवार, नितीन कुंबलकर, आशिष दुआ, माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, विजय दर्डा, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, सचिन नाईक, वामनराव कासावार, जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, सध्या सव्वालाखे, विजय राठोड, विजय खडसे, बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले की, काँग्रेस भवनाच्या जागेकरिता माणिकराव ठाकरे यांनी भरपूर प्रयत्न केले. त्यासोबतच जिल्ह्यातील इतरही नेत्यांनी पाठपुरावा केल्यामुळे भव्यदिव्य वास्तू यवतमाळात उभारण्यात येणार आहे. याचाच कित्ता राज्यभर गिरवण्यात येणार असून, संपूर्ण राज्यात जिल्हा काँग्रेस भवन उभारण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री थोरात यांनी दिली. लवकरच काँग्रेसला वैभवाचे दिवस येतील. ऐन कोरोनाच्या काळात कर्जमाफीचा निर्णय महा विकास आघाडीच्या सरकारने घेतला. फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी अतीशय चुकीची होती. मात्र, महाविकास आघाडीने कुठल्याही अडथळा विना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. यंदा उच्चांकी कापूस विक्री राज्यात झाली.
कार्यकर्त्यांना बळ देऊ
भाजप विरोधी सत्ता स्थापन करायची होती म्हणून महा विकास आघाडीसोबत आलो. सत्तेत राहून केवळ मौजमजा करायची नाही, तर ह्यातून सर्वसामान्यांचे काम तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. विरोधकांनी कितीही आगडोंब केली, तरी पाच वर्ष महा विकास आघाडीचे सरकार राहील.
-अशोक चव्हाण, साबां. मंत्री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here