Home Breaking News अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा- विठ्ठल धुरपुडे वाहतूक अधिकारी

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा- विठ्ठल धुरपुडे वाहतूक अधिकारी

144
0

प्रतिनिधी महागाव:-
महागाव तालुक्यात वाढत्या अपघातामुळे अनेक झण जागीच ठार झाले आहेत तर खडका येथे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी अपघातात एक झन जागीच ठार झाला होता.वाहतूक नियमविषयी जागृती होऊन काटेकोर पालन करावे यासाठी हिवरा संगम येथे एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये वाहतूक अधिकारी यांनी वाहतूक नियमविषयी मार्गदर्शन केले.
जीवन हे अमूल्य आहे आणि ते आनंदाने जगा. वाहन चालविताना आपली तसेच समाजाची काळजी घ्या.नियमांचे उल्लंघन करून गाडी चालवू नका. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तरी वाहतुकीचे नियम पाळा व सोबतच नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगताना गाडी चालवत असताना मोबाईलचा वापर टाळा,विनापरवाना कोणतीही गाडी चालवू नका यामुळे अपघात झाल्यास तुम्ही व गाडी शिक्षेस पात्र ठराल तसेच हेल्मेट वापरल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले असून हेल्मेट घातलेच पाहिजे तसेच अनेक झन वेगाने वाहन चालवीत असतात अतिवेगामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू ओढवल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.मात्र अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेगाचे भान ठेवले पाहिजे. डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे सुद्धा टाळावे जेणेकरून अपघात घडणार नाहीत. तसेच पालकांनी सुद्धा लायसन्स असल्याशिवाय आपल्या मुलांना गाडी चालविण्यासाठी देऊ नये व आपले नातेवाईक, मित्र किंवा मुलाचे रफड्राव्हिंग असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्यात सुधारणा करा.मुलांना उठसुठ गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या तर सर्वांनीच अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावे असे आव्हान मार्गदर्शनामध्ये महामार्ग पोलीस केंद्र कोसदनी येथील वाहतूक अधिकारी विठ्ठल दुरपुडे यांनी केले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष राम जाधव, महामार्ग पोलीस कर्मचारी रुपेश तिजारे, गुणवंत बोईनवाड, मधुकर राठोड व गावातील अँटो चालक, दुचाकीस्वार व नागरीक सोशल डिस्टन मध्ये उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here