Home Breaking News शेतकरी हिताबाबत महागावात ‘प्रहार’चा रास्ता रोको

शेतकरी हिताबाबत महागावात ‘प्रहार’चा रास्ता रोको

40
0
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागांव दि 4 :- शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करा असे महाराष्ट्र शासनाचे आदेश असतांना राष्ट्रीय कृत बैंकेचा मनमानी, कारभार व अरेरावी भाषा व दलालांचे बैंकेत सावट शेतकरी यांची लूट,यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. महागाव तालुक्यातील युनियन बैंक येथे काही दिवसा अगोदर युनियन बैंक येथे शेतकऱ्यांसोबत सुरक्षा रक्षक याने झटपटीमध्ये बैंकेचा काच व शेतकरी यांना थोडा मार लागला असे कळताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे व सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले. शेतकरी यांची व्यथा ऐकली व सर्व शेतकरी यांना घेऊन तहसील गाठले व तहसीलदार यांना सर्व व्यथा सांगितली तहसीलदार यांनी सांगितले की तुम्ही तक्रार करा, त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी  यांना निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत दिले,असताना तात्काळ पीक कर्ज वाटप करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता, आज दि ०३/११/२०२० प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले.यावेळी उपस्थित प्रहार चे सर्व पदाधिकारी व शेतकरी होते. येथील बस स्थानक चौकात राष्ट्रीय महामार्गावर प्रहार कार्यकर्त्यांनी ठिय्या देत वाहतूक अडवून धरली.आज आंदोलनात उपस्थित प्रहार उपजिल्हाप्रमुख अमोल आवटे,तालुका प्रमुख पवन धरणकर,शहर प्रमुख राणू कुरेशी,उपतालुका प्रमुख सागर डोंगरे,तालुका सचिव राहुल वानखेडे,शहर उपप्रमुख निरंकार पंजेवाड,शेतकरी नेते शरदचंद्र डोंगरे,बर्गे,प्रविण नरवाडे,सुरज नरवाडे आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here