Home Breaking News शिवाजी उद्यानाकडे पालिकेचे दुर्लक्ष

शिवाजी उद्यानाकडे पालिकेचे दुर्लक्ष

98
0
विविध समस्यांबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन
यवतमाळ : स्थानिक शिवाजी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन यवतमाळ शहराच्या वैभवात अनेक वर्षापासुन भर घालत आहे पण गेल्या अनेक दिवसापासुन या गार्डनची दयनीय अवस्था झाली आहे.  या गार्डनच्या देखभाली कडे नगर पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या गार्डनचा चांगल्या प्रकारे विकास होणे आवश्यक आहे या गार्डन मध्ये यवतमाळ शहरातील अनेक नागरिक व लहान मुले येत असतात पण काही दिवसापासुन गार्डन मध्ये गाजर गवत वाढले असुन मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले
गार्डन चौकातील हायमास्ट लाईट अनेक दिवसापासुन बंद आहे त्यामुळे या परिसरात अंधार पसरला असुन चोरीचे प्रमाण वाढले आहे. व लहान मुलांचे खेळणे खराब अवस्थेत पडले अाहे. यातच चौकीदारनीही गार्डनला रामराम ठोकला आहे. गार्डनच्या चारही बाजूचे ताराचे कुंपण तुटलेल्या असुन गार्डन मध्ये रात्रीस खेळ चालु असुन मद्यपींना सुळसुळाट वाढला आहे. तसेच कुंपन तुललेल असल्यामुळे गार्डनच्या आत डुकराचे सामाज्य निर्मान झाले आहे. या गार्डन मधील सर्व समस्या पाहता दि. १८ डिसेंबर २०१९ रोजी गार्डनच्या विकास कामाकरिता नगर पालिका यवतमाळ व लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. पण विकास निधी दुरच साध गार्डनच्या देखभाली कडे नगर पालिका दुर्लक्ष होत आहे. त्यातच आपल्या वर कोरोना महामारीमुळे संकट आले असुन वाढत्या गजर गवतामुळे व डुकरांचा हैदोस मुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सर्व विषयाची माहिती घेण्यात आली असुन मा.मुख्यधिकारी साहेब नगर पालिका यवतमाळ निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अंकुश पांडे, निकेतन ठाकरे, अमित क्षिरसागर उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here