Home Breaking News  महागाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

 महागाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

243
0
तालुक्यातील शेतकरी महागाव तहसीलवर धडकले

कपाशीच्या बीटी कंपनीवर कारवाईची मागणी

तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागाव :- महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून प्रशासनाकडून अद्यापही कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही तालुक्यातील दरवर्षीच खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन हे नगदी पीक अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे निस्थनाभुत होत आहे यावर्षी सुद्धा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असुन परिणामी सोयाबीन व कापसाचे उत्पन्न कमालीचे घटले आहे उत्पादनावर होणारा खर्च सुद्धा निघत नसल्याने ेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे तसेच मागील तीन वर्षापासून कपाशीच्या बीटी बियाण्यांवर बोंड आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे याही वर्षी सुद्धा कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंड आळी आल्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे शासनाने याची गंभीर दखल घेऊन सदोष बीटी कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी दरवर्षीच ही परिस्थिती जर राहिली तर कापूस उत्पादक शेतकरी एक दिवस संपेल..! तसेच या वर्षी अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई व पिक विमा मंजूर करण्यात यावा मागच्या वर्षी अधिकाऱ्यांच्या घोर चुकीमुळे गुंज मंडळला कापसाच्या पिक विमा मधून वगळण्यात आले होते ती चूक पुन्हा होऊ नये वरील विषयाची शासनाने गंभीर दखल घ्यावी अन्यथा शेतकर्‍यांच्या वतीने या विरोधात जन आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन गुंज परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार नामदेव इसाळकर यांना दिले यावेळी नागोराव कदम प्रमोद जाधव,राम जाधव युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, सागर डोंगरे,समशेर खान पठाण अमोल देशमुख, बाळू राठोड किशोर नगारे तानाजी जाधव श्याम मेटकर राम देवकते रमेश लहाने नितीन चिपडे ज्ञानेश्वर जाधव नितीन राठोड विठ्ठल कांबळे शेषराव पुंड भारत मते रवी पुंड नितीन आडे रामदास चव्हाण उपस्थित होते राष्ट्रीय किसान मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक संघटनेने यावेळी पाठिंबा दिला.

महागाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी कापूस सोयाबीनचा पिक विमा शेतकऱ्यांना मंजूर करण्यात यावा तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई पासून वगळण्यात आल्यास महागाव मध्ये शेतकऱ्यांच्या वतीने याविरोधात जनआंदोलन करण्यात येईल.
– प्रमोद जाधव युवा शेतकरी नेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here