Home Breaking News स्वाभिमानी युवा संघटनेची अशीही गांधीगिरी

स्वाभिमानी युवा संघटनेची अशीही गांधीगिरी

114
0
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यात लावले बेशरमीचे झाड; आंदोलनाची दखल मुरुम टाकून बुजविला खड्डा
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
 महागाव:- महागाव तालुक्यात असलेल्या हिवरा संगम येथुन गेलेल्या राष्ट्रीय महार्गावरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने दररोज येथे अपघात होतात. दिवसेंदिवस अपघात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शुक्रवारी ठीक 11.30 च्या सुमारास एक स्वीफ्ट डिझायर गाडी खड्डयात ऊसळली हा अपघात एवढा भयानक होता परंतु सुदैवाने एअरबॅग बाहेर आल्यामुळे गाडीतील प्रवाशी बचावले. ही घटनेचे गांभीर्य मात्र संबंधित विभागाला अजूनही आलेले नाही. याचा निषेध करीत  6 नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी खड्यात बेशरमीचे झाड लावून जाहीर निषेध नोंदवित अभिनव आंदोलन केले.
नागपूर बोरी तुळजापूर जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून हिवरा या गावावरून बायपास रस्ता गेलेला आहे. बायपास रस्त्याचे काम बंद असून आई एकविरा देवीच्या मंदिराजवळील रस्त्यावर मोठं मोठे जीवघेणे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  शिवाय  रस्ते कंपनी  याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्यामुळे दिनांक 6 शुक्रवार रोजी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली खड्यात बेशरमीचे झाड लावून जाहीर निषेध नोंदवित अभिनव आंदोलन केले. यावेळी माजी सभापती गजानन कांबळे, सुनील बोकसे, सोहेल खान, दीपक काळे, विजय कदमसह स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here