Home Breaking News शिवसेनेच्या प्रयत्नाने महागाव येथे आरटीओ कॅम्प सुरू

शिवसेनेच्या प्रयत्नाने महागाव येथे आरटीओ कॅम्प सुरू

41
0
महागाव : तालुक्यातील नागरिकांना आरटीओ संबंधित कोणत्याही कामाकरिता यवतमाळ व उमरखेड येथे जावे लागत होते्. ही बाब लक्षात घेत शिवसेनेचे रामराव पाटील नरवाडे, प्रमोद राजू राठोड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या शिफारस पत्र आरटीओ यवतमाळ यांना दिले होते. त्यावरून  परिवहन उपनिरीक्षक गोसावी व  निकम हे स्थानिक विश्रामगृह महागाव येथे आले असता पुष्पगुच्छ देऊन स्वागत समारंभ कार्यक्रम घेऊन आरटीओ कॅम्पची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामराव पाटील नरवाडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष सरस्वती राजनकर, डॉक्टर बी. एन. चव्हाण, प्रमोद भरवाडे, अविनाश नरवाडे, विजय नरवाडे, रामचंद्र तंबाके ,नगरसेवक राजू राठोड, रवींद्र भारती, विशाल पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यापुढे महिन्यातील  प्रत्येक पहिला शुक्रवार महागाव येथील आरटीओ कॅम्पचा असेल. कॅम्प करीता सर्वांनी सहकार्य करावे अशी प्रतिपादन परिवहन उपनिरीक्षक गोसावी यांनी केले. अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सहकार्यामुळे आम्हाला महागाव तालुका करिता आरटीओ कॅम्प मिळाला असल्याचे रामराव पाटील यांनी  मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नगरसेवक राजू राठोड यांनी तर आभार प्रदर्शन तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here