Home Breaking News पीकविमा कंपनीकडून शेतक-यांची फसवणूक

पीकविमा कंपनीकडून शेतक-यांची फसवणूक

55
0
जन आंदोलन समितीचा आरोप : महागाव तहसिलदारांना निवेदन
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागांव दि 7 :- यवतमाळ जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांची पिकविमा कंपनीने फसवणूक केल्याने विमा कंपनीवर फौजदारी कार्यवाही करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टर ५००००/- रु. प्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे.  यवतमाळ जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. यामध्ये कोणता निकष लावून शेतकऱ्यांना वंचित ठेवले हे आजपर्यंत कळालेले नाही. शेतकऱ्याने कायदा हातात घेण्याची शासनाने वाट बघू नये, या न्याय मागण्यासाठी जनआंदोलन आधार संघर्ष समिती हाहाकार मोर्चाचे आंदोलन लवकरच करणार, अशी मागणी  करीत जगदीश नरवाडे  यांनी या आशयाचे निवेदन महागाव तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी-यांना पाठविले.
जिल्ह्यात पिक विमा कंपनीचे कार्यालय कुठे दिसत नाही. कृषि अधिकारी याच्याकडे न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर विमा कंपनीचा टोल फ्री १८००१०३५४९० क्रमांकावर फ्री कॉल करा असा फुकट सल्ला दिला जातो आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचा सदर टोल फ्री क्रमांकावर फोन लागलेला नाही. यावरुन जिल्हा कृषि अधिकारी व पिकविमा कपनीचे कार्य  केलेली दिसते. जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यापैकी संपुर्ण जिल्ह्यात केवळ ८४०० शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली हे भिषण वास्तव्य समोर आले आहे. एकही शेतकऱ्याला पिक विमा मंजुर झालेला नाही. आलेले पिक सोयाबीन एकरी एक ते दोन क्लिटल शेतकऱ्याच्या हातात आले आहे. मजुरीचा खर्च सुध्दा निघालेला नाही. कापूस पिकास बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे सदर कापसाचे उत्पन्नात बौडामध्ये बोंडअळी झाल्याने शतक्री नाईलाजास्तव कापुस उपटून फैकत आहे. सद्या मोठ्या प्रमाणात घट होवून एकरी जवळपास दोन क्लिंटल कापूस आला आहे. प्रतयेक शेतकऱ्यास आपले कुटूंब वर्षभर जगविण्याची चिंता असल्याने शेतकरी फार चिंतेत दिसत आहे. वर्षभर कुटूबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकऱ्याजवळ जुन्या कर्जाशिवाय काहीच शिल्लक नाही. शासनाने पिक विमा कंपन्यावर कठोर कार्यवाही करुन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं. विमा कंपनीला आदेश देवून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसगट दर हेक्टरी ५००००/- रु. जमा करावे नसता येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रकाण खुप मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल. अर्थपूर्ण संबंध दिसून आहेत कारण पीकविमा कंपनीच्या विरोधात आज पर्यंत ठोस कार्यवाही झालीच नाही, तातडिने कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here