Home Breaking News महागाव भाजपाची तालुका कार्यकारणी गठित

महागाव भाजपाची तालुका कार्यकारणी गठित

189
0
सरचिटणीस पदी योगेश वाजपेयी, संजय पाटे यांची फेरनिवड
तालुका प्रतिनिधी / अंकुश कावळे
महागांव :- भारतीय जनता पार्टी महागावची नुकतीच मा. आ. राजेंद्र नजरधने यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार नामदेव ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर, विलास शेबे, विलास कवाने, अल्पसंख्यांक जिलाध्यक्ष डॉ. इरफान कुंदन, सुनील टेमकर, जि. प.सदस्य विलास भुसारे सर, तालुकाध्यक्ष दीपक आडे उपस्थित होते. कार्यकारणी मध्ये सरचिटणीस पदी योगेश वाजपेयी व संजय पाटे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच चार सरचिटणीस, नऊ उपाध्यक्ष, अकरा सचिव, कोषाध्यक्ष, सात मोर्चाचे अध्यक्ष, अठरा सेलचे अध्यक्ष आणि कार्यकारणी सदस्य म्हणून तब्बल एकशे पाच जणांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आ.ससाणे व मा. आ.नजरधने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here